Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून प्रियंका चोप्राने सांगितले पती निकचे खोटे वय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 19:00 IST

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. अधूमधून प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होते. पण निक नेहमी तिच्या मदतीला धावून येतो.

ठळक मुद्देनिक हा प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले होते.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या संसारात आनंदी आहेत. अधूमधून प्रियंका सोशल मीडियावर ट्रोल होते. पण निक नेहमी तिच्या मदतीला धावून येतो. ताजे प्रकरणही असेच. होय, लोकांनी प्रियंकाला ट्रोल केले आणि निक तिच्या मदतीला धावून आला.नुकताच प्रियंका व निक या दोघांनी टकीला ब्रँडची एक कमर्शिअल जाहिरात शूट केली. निक या बँडचा को-ओनरही आहे. या इव्हेंटचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. यानंतर प्रियंकाने या बँडच्या लॉन्च पार्टीचे फोटो शेअर केले होते.

‘27 वर्षांच्या वयात टकीलाचा मालक असणे अभिमानास्पद गोष्ट आहे,’ असे हे फोटो शेअर करताना प्रियंकाने लिहिले. मग काय, प्रियंकाने फोटोला दिलेले हे कॅप्शन पाहून लोकांनी प्रियंकाला ट्रोल करणे सुरु केले.

प्रियंकाने निकचे वय खोटे सांगितल्याचा आरोप तिच्यावर झाला. निक 26 वर्षांचा आहे आणि प्रियंकाने तो 27 वर्षांचा असल्याचे सांगितले. यावरून ट्रोलर्सने प्रियंकाला लक्ष्य केले. पण प्रियंका आणखी ट्रोल होण्याआधीच निक तिच्या मदतीला आला.

त्याने इन्स्टास्टोरीवर एक मीम शेअर केले. हे मीम शेअर करताना, ‘प्रियंकाला माझा वाढदिवस माहित आहे,’ असे निकने लिहिले.

होय, दोनच आठवड्यांनी निक 27 वर्षांचा होणार आहे. निकने अगदी अचूकपणे युजर्सचे लक्ष याकडे वेधले आणि सोबत पत्नीला ट्रोल होण्यापासून वाचवले.निक हा प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले होते. जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर प्रियंका लवकरच तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. ‘स्काय इज पिंक’ हा तिचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास