Join us  

या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 11:38 AM

2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.

निया शर्मा जे काही करते ते जरा हटकेच असते. त्यामुळे तिची सर्वाधिक चर्चाही रंगते. टेलिव्हिजन सेन्सेशन असणारी निया शर्मा आता इंटरनेट सेन्सेशन बनत आहे. बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केलेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली. ब-याचदा तिला तिच्या बोल्ड आणि सेक्सी लूक्समुळे ट्रोल केले जाते. तिची खिल्ली उडवली जाते. मात्र या गोष्टीचा तिला काहीच फरक पडत नाही. उलट असे हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत ती सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. 

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.

निया सोशल मीडियावर  कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.  इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.  2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती. लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

टॅग्स :निया शर्मानागिन 3