Join us

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत नवा ट्विस्ट, अर्जुन संपूर्ण गावासमोर शेहेनशाह म्हणून समोर येईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 08:00 IST

अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांना भावते आहे, ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांना भावते आहे, ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण संपूर्ण गाव शेहेनशाहच्या शोधात आहे,पृथ्वी, सुजय आणि रॉकेट मिळून आप्पीला किराणा माल न मिळावा म्हणून खूप प्रयत्न करतायत आणि शेहेनशाह समोर आल्याशिवाय तुला किराणा मिळणार नाही अशी धमकी सुद्धा देतात. 

दिप्या अर्जुन समोर जाऊन विनंती करतो तेव्हा अर्जुन शेहेनशाह म्हणून पूर्ण गावा समोर येण्याच ठरवतो. अर्जुनला आप्पी, छकुली लोकांसमोर येण्यास मनाई करतात. पण आता काही पर्याय नसल्याने अर्जुन लोकांसमोर येऊन उभा रहातो पण  इतक्यात मागून शेहेनशाह सापडला असा आवाज येतो.

 तर दुसरीकडे यशा आप्पीच्या अभ्यासासाठी शहनशहा म्हणून सर्व गावासमोर येतो. त्याला पाहुन सर्वजण आश्चर्यचकित होतात. यशाला पूर्ण गावासमोर प्रतापची माणसे मारत आसताना अर्जुन त्याला वाचवून पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तेव्हा अर्जुनने पुन्हा आप्पीची बाजू घेतल्याने प्रतापराव त्याला निलंबनाची धमकी देतात . आता अर्जुन संपूर्ण गावासमोर शहनशहा  म्हणून समोर येईल का आणि अर्जुनच शेहेनशाह आहे हे सर्वांना कळल्यावर काय होईल? हे पाहणे रोमांचक असणार आहे. 

टॅग्स :झी मराठी