Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये आला नवीन ट्विस्ट, राधिका गुरूनाथला शिकवणार चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:27 IST

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. एकीकडे गुरूनाथ राधिकाला तो पूर्वीसारखे असल्याचे  भासविण्यासाठी नाटक करतो आहे. त्यामुळे तो शनायाला ओळखत नाही, असं भासवत आहे. मात्र त्याच्या अशा वागण्यामुळे शनाया वैतागली आहे. तर दुसरीकडे राधिकाली गुरूनाथ नाटक करत असल्याचं वाटतं आहे. त्यामुळे राधिका शनायाला भेटते आणि गुरूनाथ आपल्या दोघींना फसवतो असल्याचं सांगते. त्यावेळी शनाया गुरूनाथनं राधिकाला कमी लेखण्यासाठी ३५ कोटी रुपये चोरतो, हे सांगते आणि त्याचं पितळ राधिकासमोर उघडकीस आणते.

झी मराठी वाहिनीने इंस्टाग्रामवर नुकताच नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात राधिका शनायाला भेटताना दिसते आहे आणि शनाया गुरूनाथने शेतकऱ्यांसाठी जमविलेला निधी ३५ कोटी रुपये चोरले ते राधिकाला सांगितलं. त्यानंतर राधिका गुरूनाथला शेतकऱ्यांचे पैसे दोन दिवसांत द्यायचे आहेत, असं सांगते. त्यावर गुरूनाथ मी काहीतरी करतो असं सांगतो. गुरूनाथला वाटतं की पैसे देऊन मी हिच्या मनात हिरो बनेन. पण, राधिका शेतकऱ्यांचे पैसे हातात आल्यानंतर काय करते ते पहा,असं म्हणते.

मालिकेच्या आगामी भागात गुरूनाथ राधिकाला पैसे आणून देतो का व राधिका गुरूनाथला चांगलाच धडा शिकवेल का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठी