Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवमाणूस' मालिकेत नवा ट्विस्ट, मंजुळाच्या एक्झिटनंतर ही अभिनेत्री करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 18:05 IST

देवमाणूस मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

देवमाणूस मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मंजुळाच्या जाण्याला डॉक्टरच जबाबदार आहेत असे सरू आजीने म्हटल्यानंतर पोलिसही डॉक्टरांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. मात्र ही वेळही डॉक्टर आपल्या चलाखीने निभावून नेताना दिसत आहेत. मंजुळाच्या एक्झिट नंतर मालिकेत पुढे काय घडणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्याची उत्सुकता अधिक ताणून न धरता आता लवकरच या मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. या नवीन पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री नेहा खान पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 

मराठी अभिनेत्री नेहा खान देवमाणूस या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नेहा खानचे चाहते तिला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. तसेच झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये ती सहभागी झाली होती. त्यात तिने आपल्या नृत्याची झलक दाखवली होती. 

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :नेहा खान