'स्त्री २' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)चे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट देत असते. नुकतेच तिने नवीन हेअरस्टाइल केली आणि त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिला हा हेअरकट खूपच चांगला वाटत आहे.
श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर नवीन हेअरकटचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत श्रद्धा नवीन हेअरकट केल्यानंतर सलूनमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत श्रद्धा लिफ्टमध्ये सेल्फी काढताना दिसते आहे. तिने फोटोत डेनिम शर्टसोबत निळ्या रंगाची पॅण्ट परिधान केलेली दिसत आहे. नवीन लूकमधील फोटोत अभिनेत्री छान स्माईल करताना दिसते आहे. फोटो शेअर करत श्रद्धाने लिहिले की, बाल बाल जच गयी.
मागील महिन्यात श्रद्धा कपूरने २०२४चा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती खाण्याचा आनंद घेताना दिसते आहे. व्हिडीओच्या मोंटाजमध्ये ती तिच्या फ्रेंड्ससोबत होळी साजरी करताना दिसत आहे आणि कुटुंबासोबत छान क्षण एन्जॉय करताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलेकी, कोणी बोलू नका की पोस्ट उशीरा आली. ख्रिसमस आणि न्यू इयरमध्ये सर्व माफ आहे. फेब्रुवारी प्लस मार्च २४ थ्रोबॅक.
वर्कफ्रंटश्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री २०२३ मध्ये 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत भूमिकेत होती. चित्रपट खूप आवडला. या चित्रपटात तिचे नाव होते टिन्नी. २०२४ मध्ये ती स्त्री २ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटात राजकुमार रावही दिसला होता. अभिनेत्री तमन्ना भाटियाने कॅमिओ डान्स केला होता.