Join us
Daily Top 2Weekly Top 5

'किसका होगा थिंकिस्तान सीझन 2’मध्ये पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार नील भूपालम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 17:20 IST

या सिरीजमध्ये नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकावेल्ली, सत्यदीप मिश्रा यासारख्या कलाकारांनी काम केले आहे.

लोकप्रिय अभिनेता नील भूपालम यांचा प्रवास सर्वांनाच माहिती आहे. 'नो वन किल्ड जेसिका', 'एनएच 10' यासारखे सिनेमे आणि '24' सारखी टीव्ही सिरीज यामधील कामांमुळे ते प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही, तर त्याने व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केलेले आहे, शिवाय नाटकांमध्ये देखील काम करत असतो. 

`किसका होगा थिंकिस्तान सीझन 2’ मध्ये तो नकारात्मक भूमिकेद्वारे पदार्पण करत आहेत. एमटीएमसी अॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे नवीन पण कावेबाज बॉस अशी त्याची भूमिका आहे, नकोशा राजकारणामुळे ते कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार आहेत. आपल्या भूमिकेबद्दल नील भूपालमने सांगितले की, सिनेमा असो, नाटक असो, टीव्ही असो की ओटीटी. कोणत्‍याही फॉर्मेटसाठी मी कधीही मागे राहात नाही. डिजिटल जगामुळे आपण आज शोच्या नव्याच विश्‍वात आलो आहोत. आता नकारात्मक भूमिकेबद्दल बोलायचं तर, कधी-कधी वाईट असणंही चांगलं !’’

पहिल्या सीझनमध्ये आपण अॅडव्हर्टायझिंग जगातले सगळे दुवे पाहिलेच आहेत, यावेळेस एमटीएमसी अॅड एजन्सीमधल्या लोकांचे आयुष्य आणि त्यातले वास्तव पाहणार आहोत. अनुभवी अॅड फिल्मचे निर्माते एन. पद्मकुमार यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली आहे. या सीझनमध्ये ऑफिसमधील लोकांचे वैयक्तिक पातळीवरचे हेवेदावे, मैत्री, प्रेम, धोके आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स अशा विविध भावनिक पातळ्या दाखवण्यात आल्या आहेत. या सिरीजमध्ये नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकावेल्ली, सत्यदीप मिश्रा यासारख्या कलाकारांनी काम केले आहे. 

 

टॅग्स :वेबसीरिजएमएक्स प्लेअर