Join us

अनिता भाभी बनत नेहा पेंडसेने सुरु केली शूटिंग, सेटवर दणक्यात झाले तिचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 20:56 IST

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. त्यानंतर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी अनेक नावांची चर्चा झाली. पण नेहाचे नाव कन्फर्म झाले. नेहा पेंडसेने मालिकेच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.

सेटवर पहिल्याच दिवशी मालिकेच्या टीमकडून तिचे दणक्यात स्वागत करण्यात आले. केक कटींग करत मालिकेच्या कलाकारांनी तिचे स्वागत केले. नेहा पेंडसेही कलाकारांचे प्रेम पाहून भारावून गेली होती.तिने आपला हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. भाभीजी घर पर है च्या माध्यमातून नेहा पेंडसे आता अनिता भाभी बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेसाठी नेहादेखील खुप उत्सुक आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा सिनेमातही झळकणार आहे.

नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे.

 

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते. वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

 

तिच्या या व्हिडीओला बऱ्याच कमेंट्स आणि लाईक्सही मिळाल्या होत्या. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.  

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है