Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक सिनेमामधून गायब झाली ऋतिक रोशनची ही अभिनेत्री, बॉलिवूड अभिनेत्यासोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:19 IST

लग्ननंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली.

विधु विनोद चोप्रा हे 'करीब' सिनेमासाठी एक नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. निरागस चेहऱ्याच्या नेहाला बघितल्यानंतर त्यांचा हा शोध थांबला. नेहाने 'करीब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली. 

‘करीब’ची ही हिरोईन गेल्या अनेक वर्षांत इतकी बदललीय की, तिला ओळखणे कठीण व्हावे.नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता.

माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते. 

लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते.  

टॅग्स :मनोज वाजपेयी