Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेला का देण्यात आल्या शुभेच्छा... कोणती गोड बातमी देतेय नेहा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 10:07 IST

नेहा पेंडसेचा मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत नेहाने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवले आहे आणि त्यासोबतच या फोटोच्या खाली अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे.

ठळक मुद्देमाझे लग्न होत नाहीये की माझा साखरपुडा झालेला नाहीये. मी बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करतेय हे देखील खरे नाहीये. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोतील सगळेचजण अनेक वर्षांपासून माझे फ्रेंड्स असून आम्ही कित्येक दिवसांनंतर भेटलो होते.

नेहा पेंडसेने आजवर मराठी, दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने बिग बॉसच्या घरात तिला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. नेहाचे लग्न अथवा साखरपुडा लवकरच होणार असल्याची चर्चा मीडियात रंगली आहे. 

नेहा पेंडसेचा मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिजीत, श्रुती मराठे, नेहा पेंडसे दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोत नेहाने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवले आहे आणि त्यासोबतच या फोटोच्या खाली अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हा फोटो आणि कॅप्शन पाहून नेहाचे लग्न किंवा साखरपुडा झाला आहे का असा अंदाज लावण्यात येत आहे. या फोटोवर नेहाच्या फॅन्सने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. 

नेहा लग्न करतेय का असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. तसेच नेहा बिग बॉस मराठी मध्ये जाणार असल्याने तिला शुभेच्छा देण्यात येत असल्याची देखील चर्चा मीडियात रंगली आहे. याविषयी इंडिया फोरमशी बोलताना नेहाने या फोटोबाबत गप्पा मारल्या आहेत. लोक जो विचार करत आहेत असे काहीही नाही असे असा या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे. याविषयी नेहा सांगते, माझे लग्न होत नाहीये की माझा साखरपुडा झालेला नाहीये. मी बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करतेय हे देखील खरे नाहीये. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोतील सगळेचजण अनेक वर्षांपासून माझे फ्रेंड्स असून आम्ही कित्येक दिवसांनंतर भेटलो होते. आम्ही आमचे हे रियुनियन खूपच एन्जॉय केले. 

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेऱ्याला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसेअभिजीत खांडकेकरश्रुती मराठे