Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेचं सावत्र मुलींसोबत आहे छान बॉण्डिंग, पाहा त्यांचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:47 IST

Neha Pendse: नुकतेच नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या सावत्र मुलींसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे.

नेहा पेंडसे (Neha Pendse) मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहा मे आय कम इन मॅडम? या मालिकेतून घराघरात पोहचली. नेहाने २०२० मध्ये उद्योगपती शार्दुल बायससोबत लग्न केले. शार्दुलचे हे दुसरं लग्न आहे आणि त्याला आधीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. नेहाचे या दोन्ही मुलींसोबत छान बॉण्डिंग आहे. हे बॉण्डिंग आपल्याला त्यांच्या बाली व्हॅकेशनदरम्यान पाहायला मिळालं. त्यानंतर आता नेहाचा तिच्या या सावत्र मुलींसोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्यांची छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

नेहा पेंडसे सध्या सिनेमा आणि मालिकेत पाहायला मिळत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या सावत्र मुलींसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओत त्या तिघी एक्सीलेटरवरून डान्स करत खाली येत आहेत. या व्हिडीओत त्यांची छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

काही दिवसांपूर्वी नेहा पेंडसे पती शार्दुल बायस आणि दोन मुलींसोबत बालीला व्हॅकेशनसाठी गेली होती. तिथे फेरफटका मारतानाचे व्हिडीओ आणि फोटो अभिनेत्रीने शेअर केले होते. त्यावेळीदेखील त्यांच्यात छान बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. नेहाने यापूर्वीही मुलींसोबत रिल बनवला आहे. 

वर्कफ्रंटनेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिने ही मालिका सोडली आणि तिची जागा विदिशा श्रीवास्तवने घेतली आहे. नेहा पेंडसे शेवटची जून या मराठी चित्रपटात झळकली.

टॅग्स :नेहा पेंडसे