Join us

नेहा महाजन बँकॉकमध्ये या बॉलिवूड अभिनेत्यासोबत करतेय शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 18:52 IST

सध्या नेहा बँकॉकमध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते. सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. नेहा ही फिटनेस फ्रिकही आहे. नित्यनियमाने ती योगा करत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या फिटनेसच्या दिनचर्येकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. 

सध्या नेहा बँकॉकमध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बँकॉकमधील फोटो नेहा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नुकतेच नेहाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने सांगितलं की,ती रणदीप हुडा व सॅम हरग्रॅव यांच्यासोबत ढाकाचं शूटिंग करत आहे. माझ्या आयुष्यातील हा खूप मोलाचा, मॅजिकल व शिकण्यासारखा अनुभव आहे. यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. 

नेहाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, ढाकाच्या सेटवर मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहे. सेटवर स्वतःची चेअर आहे ज्यावर सिनेमातील पात्राचे नाव असेल. त्या चेअरवर नेसा असं नाव दिसत आहे.

खरंतर नेहाने 'कॉफी आणि बरचं काही', 'वन वे तिकीट', 'निळकंठ मास्तर' असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत.  

नेहाने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

टॅग्स :नेहा महाजनरणदीप हुडा