Join us

'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज'मध्ये नेहा महाजन आणि भूषण प्रधान पुन्हा दिसणार एकत्र, स्वतंत्र गोएल यांचं दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 21:01 IST

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री नेहा महाजनने कॉफी आणि बरंच काही चित्रपटात काम केल्यानंतर आता पुन्हा एकदा दोघे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री नेहा महाजनने कॉफी आणि बरंच काही चित्रपटात काम केल्यानंतर आता पुन्हा एकदा दोघे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ते दोघे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चित्रपटात दिसणार आहेत. निर्माते स्वतंत्र उर्फ सॅव्ही गोएल यांनी 'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज' या मराठी सिनेमात भूषण प्रधान, नेहा महाजन, दिप्ती धोत्रे, स्वाती कार्णेकर, प्रसाद ओझरकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. दुष्यंत दुबे आणि किर्ती किल्लेदार यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन सॅव्ही यांनीच केलं असून, सवीना क्रिएशन या बॅनरखाली त्यांनी 'कॅान्ट्रॅक्ट मॅरेज'चं शूटिंग पूर्ण केलं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. याशिवाय या सिनेमाबाबतच्या काही गोष्टी सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. सॅव्ही हे बॅालिवूडमधील एकमेव असे निर्माते आहेत, ज्यांनी केवळ पाच वर्षांच्या काळात पाच चित्रपट बनवले आहेत.

पंजाबमधील पटियालामध्ये जन्मलेल्या गोएल यांचं बालपण तिथेच गेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बँक ऑफिसरच्या रूपात त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर १९९६मध्ये बँकिंग क्षेत्रात चांगली संधी मिळाल्यानं ते युएसएला रवाना झाले. तिथे पेट्रोलियम उद्योगातही चांगलं यश मिळवत त्यांनी पेट्रोल स्टेशन्सचा बंच आणि कन्व्हिनियन्स स्टोर्स सुरू केले.

महाविद्यालयीन दिवसांपासूनच गोएल यांना थिएटरमध्ये रूची होती आणि तिथे ते अॅक्टीव्हही होते. २०१४ मध्ये त्यांनी आपलं स्वप्न साकार करत बॅालिवूडमध्ये एंट्री केली. सध्या ते भारतीय सिनेसृष्टीत सक्रीय आहेत.
टॅग्स :भुषण प्रधाननेहा महाजन