Join us

PICS : नेहूप्रीत दा ब्याह...! नेहा कक्करच्या हातांवर रंगली रोहनप्रीतच्या नावाची मेहंदी  

By रूपाली मुधोळकर | Updated: October 23, 2020 17:56 IST

लग्नाआधीचे PHOTO VIRAL

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर उद्या 24 ऑक्टोबरला लग्नबेडीत अडकतेय.  रायझिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंग याच्याशी  नेहा लग्नगाठ बांधणार आहे. तर या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. नेहाच्या हळदीचे व मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.दिल्लीत नेहा व रोहन लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. गुरुवारीच या लग्नासाठी नेहाचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर लगेच नेहाच्या लग्नाचे विधी सुरु झालेत.

दिल्लीचे नामवंत मेहंदी आर्टिस्ट राजू मेहंदीवाला यांच्या टीमने नेहाच्या हातांवर मेहंदी रचली. याचे काही फोटो मेहंदीवाला यांनी शेअर केले आहेत. नेहाच्या हातावर लग्नाची मेहंदी रचणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी लिहिले आहे.

नेहाच्या हळदीचे काही फोटोही व्हायरल होत आहे. यात नेहा पिवळ्या रंगाच्या साडीत दिसतेय. तर रोहनप्रीतने यॅलो रंगाचा कुर्ता व पायजामा घातला आहे.  २० आॅक्टोबर रोजी नेहाचा रोका पार पडला. त्याचा व्हिडीओ नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्येही नेहा व रोहन मिळून भांगडा करताना दिसत आहेत.

कोण आहे रोहनप्रीत सिंग?

आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या.

गेल्या काही दिवसांपासून नेहा व रोहनप्रीतच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  आता नेहाचा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर   रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते.   

नेहा कक्कर म्हणाली, तू माझा आहेस...; अखेर नेहूप्रीतने दिली प्रेमाची कबुली 

टॅग्स :नेहा कक्कर