Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्कड थिरकली 'लूडो खेलूंगी'वर, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 17:17 IST

गायिका नेहा कक्कड पहिल्यांदाच डान्स फ्लोअरवर 'लूडो खेलूंगी' या गाण्यावर थिरकली. यावेळी तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईसदेखील डान्स करताना दिसतो आहे.

ठळक मुद्देनेहा कक्कडचा डान्स झाला वायरल

गायिका नेहा कक्कडने आपल्या सुरेल आवाजाने तरूणाईंना चांगलीच भुरळ पाडली आहे. तिने गायलेले 'काला चश्मा', 'कर गई चुल', 'लंडन ठुमकदा' यांसारखी अनेक गाणी लोकप्रिय झाली. मात्र आता तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ती पहिल्यांदा डान्स फ्लोअरवर उतरली आहे. तिच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेहा कक्कड 'लूडो खेलूंगी' या गाण्यावर थिरकत असून तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यावेळी तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईसदेखील नाचताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. दरम्यान, नेहाचा हा डान्स पाहता ती नृत्यकौशल्यात पारंगत असलेल्या एखाद्या नर्तकीसारखी प्रत्येक स्टेप करत आहे. या डान्सचा व्हिडिओ नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओ १४ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर व्हिडिओमधील 'लूडो खेलूंगी' हे गाणे नेहाचा भाऊ टोनी कक्कडने गायले आहे.

 

टॅग्स :नेहा कक्कर