Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा धूपिया व अंगद बेदी लवकरच देणार ‘गुड न्यूज’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:08 IST

अभिनेत्री नेहा धूपियाने गत १० मे रोजी अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. दिल्लीच्या गुरूद्वारात दोघांचेही लग्न झाले.

अभिनेत्री नेहा धूपियाने गत १० मे रोजी अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. दिल्लीच्या गुरूद्वारात दोघांचेही लग्न झाले. या लग्नाला नेहा व अंगदच्या जवळचे अगदी मोजके काही लोक उपस्थित होते. अचानक झालेल्या या लग्नानंतर एक वेगळीच चर्चा रंगली. ती म्हणजे, नेहा लग्नापूर्वीचं प्रेग्नंट असल्याची. प्रेग्नंसीमुळेच नेहा व अंगदने घाईघाईत लग्न उरकले, असेही मानले गेले. पण नेहा व अंगद दोघांनीही या बातमीचा इन्कार केला. दोघांच्या घरच्यांनीही या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले. पण आता नेहाच्या प्रेग्नंसीबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, नेहा धूपिया आणि अंगद बेदी लवकरच प्रेग्नंसीची बातमी कन्फर्म करू शकतात. आता या बातमीत किती सत्यता आहे, ते आम्हाला ठाऊक नाही. पण ही बातमी खरी असेल तर आमच्या शुभेच्छा नेहा व अंगदसोबत आहेत.नेहा व अंगद अनेकवर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. खरे तर चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.

ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता.

 

टॅग्स :नेहा धुपिया