Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीति मोहनला संगीत नाही तर 'या' क्षेत्रात करायचे होते करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:30 IST

 नीति मोहन तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे गेल्या काहीपासून लाईमलाईटमध्ये आहे. लवकर नीति  निहार पांड्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

ठळक मुद्देनीति बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगू भाषेत देखील पार्श्वगायन केले आहे

 नीति मोहन तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे गेल्या काहीपासून लाईमलाईटमध्ये आहे. लवकर नीति  निहार पांड्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकतीच नीतिने द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या पर्सनल लाईफबाबत अनेक खुलासे केले. नीतिला गायक नाही तर सैन्यात जायची इच्छा होती.

नीति म्हणाली, ''मला पहिल्यापासून भारतीय सैन्यात जायची आणि अधिकारी बनण्याची इच्छा होती. पण मला वाटते संगीत क्षेत्रात येणेच माझ्या नशिबात होते. शाळेत आणि कॉलेजात असताना मी NCC मध्ये असायचे आणि मला C सर्टिफिकेट देखील मिळवले होते. मी एका प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देखील सामील होते आणि काही प्रसंगी बँड लीडर देखील होते, जे खूप लोकांचे स्वप्न असते. पण गोष्टी बदलल्या आणि आता मी गायिका झाले. पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की माझा आवाज सीमेवरील सैंनिकांपर्यंत पोहोचावा.''

नीतिबद्दल सांगायचे तर ती बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. तिने हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगू भाषेत देखील पार्श्वगायन केले आहे.   ए आर रेहमान आणि गुलजार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत तिने काम केले आहे.  निहार व नीति दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत.याच महिन्यात बॉयफ्रेन्ड निहार पंड्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.