Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आधीच लक्षात यायचा बऱ्याच पुरूषांचा वाईट हेतू ', नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:44 IST

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनया व्यतिरिक्त बेधडक विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येतात.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनया व्यतिरिक्त बेधडक विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येतात. नीना गुप्ता सिनेमांव्यतिरिक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजवर त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी केलेला खुलासा ऐकून बरेच जण हैराण झाले आहेत. त्या सिंगल मॉम असल्यामुळे अनेक पुरूषांनी त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केल्याचे नीना गुप्ता यांनी सांगितले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सांगितले की, बराच काळ नीना गुप्ता या सिंगल होत्या. यावरून नीना गुप्ता यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्या एकट्या असताना पुरुषांनी त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की,हो असे घडले आहे. मात्र मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे हेतू लक्षात यायचे. तसेच कोणीही महिलेच्या इच्छेशिवाय तिच्या जवळ येऊ शकत नाही.

'सरदार का ग्रँडसन' आला भेटीलानीना गुप्ता यांचा 'सरदार का ग्रँडसन' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि अभिनेत्री राकुलप्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. काशवी नायर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात में सोनी राजदान, अदिति राव हैदरी, कुमुद मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘सच कहूं तो’मधून उलगडणार नीना गुप्तांचं आयुष्यनीना गुप्ता यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होतेय. नीना यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचा एक व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे. ‘सच कहूं तो’ असे त्यांच्या या आत्मचरित्राचे नाव आहे. पेंगुइन इंडिया हे आत्मचरित्र प्रकाशित करतेय. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील दिवस, ८० च्या दशकात मुंबईत जाण्याचा निर्णय, लग्नाआधी आई बनण्याचा निर्णय, बॉलिवूडमधील राजकारण अशा अनेक गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. नीना गुप्तांचे हे आत्मचरित्र येत्या १४ जूनला प्रकाशित होत आहे.

टॅग्स :नीना गुप्ताअर्जुन कपूररकुल प्रीत सिंग