Join us

-म्हणून साठीतल्या नीना गुप्ता शेअर करतात स्वत:चे बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 15:24 IST

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही नीना अभिनयासोबतच आपल्या बोल्ड फॅशन व स्टाईलमुळे चर्चेत असतात. या वयातही इतके बोल्ड कपडे, स्टाईल यामागे नेमके काय कारण असावे?

ठळक मुद्देअलीकडे नीना गुप्ता या ‘बधाई हो’ या चित्रपटात दिसल्या होत्या. लवकरच त्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही नीना अभिनयासोबतच आपल्या बोल्ड फॅशन व स्टाईलमुळे चर्चेत असतात. या वयातही इतके बोल्ड कपडे, स्टाईल यामागे नेमके काय कारण असावे? तरूण अभिनेत्रीच्या भूमिका मिळवण्यासाठी तर हा खटाटोप नाही ना? नीना यांना अलीकडे नेमका हाच प्रश्न केला गेला. यावर त्यांनी वेगळेच उत्तर दिले.

हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, नीना यांना त्यांच्या बोल्ड फॅशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तरूण अभिनेत्रीच्या भूमिका मिळाव्यात म्हणून तुम्ही हे सगळे करता का? असा थेट प्रश्न त्यांना केला गेला. यावर नीना हसल्या. ‘माझ्या बोल्ड फॅशनमुळे मला यंग अ‍ॅक्ट्रेसचे रोल तर मिळाले नाहीत. पण परमेश्वराने मला इतके सुंदर शरीर दिले, याचा मला आनंद आहे. मी फॅशनबद्दल प्रचंड कॉन्शिअर राहते. माझ्या हॉट फोटोंवर प्रचंड कमेंट्स येतात. साध्या कपड्यातला फोटो शेअर केला की, त्यावर तितक्या कमेंट पडत नाहीत. पण हॉट फोटो शेअर करताच कमेंट्सचा पूर येतो. मी हे सगळे खूप एन्जॉय करते. मला फार कमी निगेटीव्ह कमेंट्स मिळतात,’ असे त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता काळासोबत अधिकाधिक फॅशनेबल होत आहेत. साडी ते वनपीस असे वेगवेगळे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नीना गुप्तांच्या फॅशन आणि स्टाईलमागे त्यांची मुलगी मसाबा हेही एक कारण आहे. मसाबा बॉलिवूडची एक लोकप्रिय फॅशन डिझाईनर आहे. तीच नीना यांच्यासाठी कपडे डिझाईन करते. 

अलीकडे नीना गुप्ता या ‘बधाई हो’ या चित्रपटात दिसल्या होत्या. वयाच्या पन्नाशीत प्रेग्नंट राहणा-या महिलेची भूमिका त्यांनी यात साकारली होती. लवकरच त्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात दिसणार आहेत. यात त्या अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारताना दिसतील. याशिवाय ‘पंगा’ या चित्रपटातही त्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात कंगना राणौत आणि रिचा चड्डा मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :नीना गुप्ता