Join us

नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ता पुन्हा एकदा पडली प्रेमात, गोव्यात बॉयफ्रेंडसोबत आहे क्वॉरांटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 18:28 IST

मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते.

नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आली आहे. मसाबा पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेत्री अदिता राव हैदारीचा पूर्व पती सत्यदीप मिश्रा आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी मसाबा अभिनेता सत्यदीप सोबत गोव्यात क्वॉरांटाईन झाली आहे. मार्चमध्ये दोघे गोव्यात फिरायला गेले होते मात्र अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे दोघे तिथेच अडकले आहेत. अद्याप दोघांनी अधिकृतरित्या आपले रिलेशनशीप स्विकारले नाही.

मात्र सत्यदीपच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दोघे गोव्यात क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत.  सत्यदीप मिश्राने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मसाबा लॅपटॉपवर काम करताना दिसतेय. तिचा हा फोटो हॉटेलच्या रुममधील आहे. सत्यदीपच्या या फोटोमुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे कंन्फर्म झाले आहे. 

.मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. 2018मध्ये दोघानी घटस्फोटोसाठी अर्ज केला आणि 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तर आदिती आणि सत्यदीप यांचे लग्न २००९ मध्ये झाले होते. त्यावेळी ती केवळ २१ वर्षांची होती. २०१३ मध्ये दोघे वेगळे झाले. आता पुन्हा एकदा मसाबा प्रेमात पडली आहे. 

टॅग्स :नीना गुप्ता