Join us

घटस्फोटादरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, आलिया उर्फ अंजना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 15:55 IST

आलिया सिद्दीकी हिने नुकतीच नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या घटस्फोटामागच्या काही कारणांचाही तिने खुलासा केला. मात्र आता या घटस्फोटामागच्या आणखी एका कारणांची चर्चा सुरु झाली आहे. 

ठळक मुद्देपैशाने तुम्ही सत्य खरेदी करू शकत नाही, असेही तिने स्पष्ट केले.

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी हिने नुकतीच त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली. पत्नीने नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याची बातमी सुरूवातीला अनेकांना अफवा वाटली. मात्र  खुद्द आलियाने ही बातमी कन्फर्म केली. या घटस्फोटामागच्या काही कारणांचाही तिने खुलासा केला. मात्र आता या घटस्फोटामागच्या आणखी एका कारणांची चर्चा सुरु झाली आहे. होय, आलियाच्या विवाहबाह्य संबंधांची चर्चा सध्या रंगली आहे. अर्थात आलियाने या बातम्यांचे खंडन केले आहे.

आलिया उर्फ अंजना किशोर पांडे हिचे पियूष पांडे नामक व्यक्तिशी अफेअर सुरु असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला गेला. यानंतर अंजनाने लगेच ट्विटरवर या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.मी कुणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही, हे मला स्पष्टपणे सांगायचे आहे. माझ्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या गोष्टी निव्वळ अफवा आहे. माझ्या फोटोंशी छेडछाड केली गेल्याचे दिसतेय, असे तिने स्पष्ट केले.

पुढे तिने लिहिले, मी काहीही वाईट केले नाही. त्यामुळे लोक काय बोलतील याची मला पर्वा नाही. माझ्या स्वत:साठी आणि मुलांसाठी मी खंबीर राहणे आणि बोलणे शिकलेय. पैशाने तुम्ही सत्य खरेदी करू शकत नाही, असेही तिने स्पष्ट केले.पियूष पांडे यानेही याबद्दल खुलासा केला. माझ्या व अंजनाच्या अफेअरच्या बातम्या खोट्या आहेत. मला बळजबरीने या प्रकरणात गोवले जात आहे. नवाज व अंजनाच्या घटस्फोटाची बातमी सुद्धा मला मीडियाद्वारे समजली. सध्या व्हायरल होत असलेल्या त्याच्या अंजनाच्या फोटोबद्दलही तो बोलला. तो फोटो एका पार्टीतील आहे. या पार्टीत अनेक लोक हजर होते. एका फोटोत तिघे असतील आणि त्यातल्या दोघांना क्रॉप केले जात असेल तर तुम्हाला वाट्टेल तो दावा करता येतो, असे त्याने म्हटले.

  बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अलीकडे अंजनाने घटस्फोटामागची पार्श्वभूमी तिने सांगितली होती. तिने सांगितले होते की, ‘हा घटस्फोट घेण्यामागे अनेक कारणे आहेत, जे मी सध्या तरी लोकांपुढे आणू इच्छित नाही. पण लग्नानंतर लगेच आमच्यात मतभेद निर्माण झाले होते. दहा वर्षांपासूनच या मतभेदांची सुरुवात झाली होती. आमच्या पूर्वापार तणाव होता. मी एक पत्नी म्हणून खूप सा-या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. कारण तो सेलिब्रिटी आहे आणि मी याबाबत बोलले असते, तर आणखी वाद झाले असते. हे नाते  वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेत. मात्र त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाली नाही. त्यांचा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्युड मला कधीच वाटला नाही़ तसेही आम्ही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहोत आणि मुलं माझ्यासोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी माझी आणि मुलांची साधी विचारपूसही केली नाही.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी