Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाने आलियावर केला 2.16 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, वाचा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 10:27 IST

शमासच्या आरोपांवर आलियाने असे दिले उत्तर

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आलियाने नवाजुद्दीनवर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. शिवाय नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्दीकी याच्यावरही आलियाने मारहाण केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपांची चांगलीच चर्चा झाली होती. आता याच शमासने आलियावर पलटवार करत, एकापाठोपाठ एक आरोप केले आहेत. आलियावर त्याने 2.16 कोटींची फसवणूक केल्याचा आरोपही ठेवला आहे.

शमास सिद्दीकी म्हणतो, - मी आलियाला  तिने प्रोड्यूस केलेल्या ‘हॉली काऊ’ या सिनेमासाठी 2.16 कोटी रूपये दिले होते. लेखी करारानुसार, हे पैसे तिने 90 दिवसांच्या आत मला परत करायचे होते. या हिशेबाने मी जुलै 2019 मध्ये तिला हे पैसे परत देण्यासाठी पहिले नोटीस पाठवले. शेवटचे नोटीस फेबु्रवारी 2020 मध्ये दिले. नोटीसचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मी वकील नियुक्त केला.- आलिया विनाकारण मला तिच्या व नवाजच्या प्रकरणात अडकवू पाहते आहे.  मी एक वर्षांपासून माझे पैसे मागतोय आणि ती माझ्याविरोधात पोलिस तक्रार करतेय.- नवाज भाईसोबत माझे व्यावसायिकही संबंध आहेत. मी 2007 ते 2012 पर्यंत टीव्ही मोठा दिग्दर्शक म्हणून काम केलेय. यानंतर टीव्ही सोडून नवाज भाईसोबत त्याचा बिझनेस मॅनेजर म्हणून काम करू लागलो. आलिया माझी चांगली मैत्रिणही होती. मी तिला नेहमीच मदत केलीय.- मला तिच्या व नवाज भाईच्या घटस्फोटाबद्दल काहीही देणेघेणे नाही. मला फक्त माझे पैसे हवेत.

आलियाने दिले उत्तरआलियाने शमासचे सगळे आरोप खोडून काढले आहेत. तिने सांगितले,  magicif  या कंपनीत नवाज, शमास आणि मी असे तीन पार्टनर आहेत. मी या कंपनीत 25 टक्क्यांची पार्टनर आहे. असे असताना शमास कुठल्या पैशांची गोष्ट करतोय . कंपनीत माझा शेअर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शमासचा पैसा आला कुठून. तो माझ्या पतीचा पैसा सांभाळत होता. त्यामुळे त्याचा हा पैसा त्याचा नसून माझा पती व माझ्या मुलांचा होता़ शमासने याचे उत्तर द्यावे.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी