Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला काम मिळणं बंद झालं तर..."; नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, सांगितला रिटायरमेंट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:42 IST

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज १९ मे रोजी वाढदिवस असून तो ५२ वर्षांचे झाला आहे. या निमित्ताने, निवृत्तीबद्दल नवाजचे काय विचार आहेत, यावर एका मुलाखतीत त्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेला नवाजुद्दीन सिद्दीकीने छोट्या-छोट्या भूमिकांपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून आज चित्रपटसृष्टीत एक मोठे स्थान निर्माण केले आहे. १९९९ मध्ये आलेल्या आमिर खानच्या 'सरफरोश' चित्रपटात एका गुन्हेगाराची अगदी छोटी भूमिका त्याने साकारली होती. अशातच नवाजुद्दीनने रिटायरमेंटबद्दल जे विधान केलंय जे चर्चेत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज १९ मे रोजी वाढदिवस असून तो ५२ वर्षांचे झाला आहे. या निमित्ताने, निवृत्तीबद्दल नवाजचे काय विचार आहेत, यावर एका मुलाखतीत त्याने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

काम मिळणे बंद झाले तर नवाजुद्दीन काय करणार?

'डिजिटल कॉमेंट्री'ला दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनला विचारण्यात आले होते की, जर भविष्यात लोकांनी त्याला काम देणे बंद केले तर तो काय करेल? यावर नवाजने उत्तर दिले की, "मी स्वतःचे चित्रपट बनवायला सुरुवात करेन. मला या गोष्टीची अजिबात असुरक्षितता वाटत नाही. उलट मला आता कामाचा असा कोणताही मोह राहिलेला नाही."


 नवाजुद्दीन पुढे म्हणाला, "जर मला काम मिळणे बंद झाले, तर मी नवीन दिग्दर्शकांची एक फौज उभी करेन. मी त्यांच्यासोबत काम करेन आणि तेही एकही रुपया न घेता. जेवणाची चिंता मला अजिबात नाही. संघर्षाच्या काळात जेव्हा मला भूक लागायची, तेव्हा जेवण मिळत नव्हते; पण आता माझा जेवणावरूनच मोह उडाला आहे. माझ्याकडे असे दोन-चार दिग्दर्शक मित्र आहेत, ज्यांच्यासाठी मी मोफत काम करेन. कमीत कमी दोन महिने तरी शूटिंग चालेल आणि ते दोन महिने ते मला जेवायला घालतील."

निवृत्तीबद्दल काय विचार आहेत?

एका ठराविक वयानंतर कलाकारांना निवृत्ती घ्यावी लागते, अशा वेळी सर्व काही सोडून पुन्हा गावी जाण्याचा विचार मनात येतो का? या प्रश्नावर उत्तर देताना नवाजुद्दीन म्हणाला, "असे होऊ शकते की मी गावी परत जाईन, पण निवृत्तीनंतर काय होईल याचा मी कधी विचार करत नाही. अभिनेता असल्याचा एक फायदा असा असतो की तो म्हातारपणापर्यंत काम करू शकतो. अडचण फक्त स्टार्सची होते. जोपर्यंत ते दिसायला चांगले आहेत, तोपर्यंतच ते स्टार राहतात, अभिनेत्याच्या बाबतीत तसे नसते." नवाजुद्दीनचा नुकताच रिलीज झालेला 'मैं अॅक्टर नही हू' हा सिनेमा प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nawazuddin Siddiqui reveals retirement plan if work stops coming.

Web Summary : Nawazuddin Siddiqui, turning 52, isn't worried about retirement. If acting roles dry up, he'll produce films, support new directors without pay, and possibly return to his village. He believes actors can work longer than stars.
टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूड