Join us

मुलांसाठी आलियासोबत तडजोड करण्यास तयार नवाजुद्दीन सिद्दीकी, पण पत्नीसमोर ठेवली ही अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:36 IST

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाने सांगितले की, तो खूप अस्वस्थ आहे आणि बऱ्याच दिवसांपासून त्याने मुलांना पाहिले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui) त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.  त्यांची पत्नी आलिया सिद्दीकी (Aaliya Siddiqui) हिने त्याच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते.  या प्रकरणाशी संबंधित एक मोठे अपडेट येत आहे. खरं तर, अभिनेत्याने पत्नी आलियासोबत कायदेशीर मुद्द्यांवर तडजोड करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे, परंतु त्यासाठी त्याने एक अट ठेवली आहे. आलियाच्या वकिलानेही त्याच्या वतीने उत्तर दिले आहे.

नवाजने वाद सोडवण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. अभिनेत्याने त्याच्या वकिलामार्फत संदेश पाठवला आहे की, त्याला त्याची दोन मुलं शोरा आणि यानी यांना भेटण्याची परवानगी दिली तर तो आलियाविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेईल. वकिलाचे म्हणणे आहे की अभिनेत्याने आपल्या मुलांना पाहिले नाही आणि त्याला त्यांची काळजी आहे, म्हणूनच तो मुलांसाठी  याचिका मागे घेण्यास तयार आहे.

आलियाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा संदर्भ देत वकिलाने सांगितले की, २७ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर ते या प्रकरणात लक्ष घालू शकतात. अभिनेत्याच्या कुटुंबाने आलियाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, ज्याची शेवटची सुनावणी 14 मार्च रोजी होती आणि पुढील सुनावणी 27 मार्च रोजी होणार आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी