Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब मुझे कोई काम ही नहीं देता, क्या करूं...? या दिग्गज अभिनेत्याला कुणी देईना काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:44 IST

बॉलिवूडचा हा दिग्गज अभिनेता चित्रपटांपेक्षा त्याच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतो.

ठळक मुद्देअगदी अलीकडे नसीरूद्दीन शाह ‘द ताश्कंद फाईल’ या चित्रपटात दिसले होते. पण या चित्रपटातील त्यांची भूमिका अगदीच छोटी होती.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरूद्दीन शाह सध्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गतवर्षी त्यांच्या एका वक्तव्यांवरून रान उठले होते. ‘देशात पोलिसाच्या हत्येपेक्षा गोहत्या महत्त्वाची झाली आहे. कायदे हातात घेणा-यांना रान मोकळे मिळते आहे. अशास्थितीत मला माझ्या मुलांच्या भवितव्याची चिंता वाटते,’ असे विधान करून नसीरूद्दीन शाह चर्चेत आले होते. नेटक-यांनी चौफेर घेरत, त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. अनेकांनी त्यांना देशद्रोही म्हणत, भारत सोडून जाण्याचे म्हटले होते. आता नसीर यांनी त्यांच्या कामाबद्दल एक मोठे विधान केले आहे. होय, आता मला कुणीच काम देत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

नसीर दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेले नाहीत, असे का? असा प्रश्न नुकताच एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला. यावर ‘क्या करू मुझे कोई काम ही नहीं देता है,’ असे ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांत बॉलिवूडमधून मला एकही इंटरेस्टिंग ऑफर आलेली नाही. गत दोन वर्षांत मी केवळ एक वेबसीरिज आणि एक बांगला चित्रपट केला. याशिवाय मला सध्या काम नाही. बॉलिवूडच्या चित्रपटांत आता मला फार रस वाटत नाही, असे ते म्हणाले.

सोशल मीडियावर होणा-या ट्रोलिंगबद्दलही ते बोलले. ज्यांच्याकडे काम नसते असे लोक फेसबुकवर बसून मला शिव्या घालतात. त्यांच्याकडे का म्हणून लक्ष द्यायचे? असा सवाल त्यांनी केला.अगदी अलीकडे नसीरूद्दीन शाह ‘द ताश्कंद फाईल’ या चित्रपटात दिसले होते. पण या चित्रपटातील त्यांची भूमिका अगदीच छोटी होती.

टॅग्स :नसिरुद्दीन शाह