Join us

नर्गिस फाखरी - उदय चोप्राचं ब्रेकअप, या म्युझिक डिरेक्टरच्या पडली प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:10 IST

38 वर्षीय अभिनेत्री नर्गिसने स्वत: ही बाब कन्फर्म केलं आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये ही चर्चा रंगलीये.

मुंबई  : अभिनेत्री नर्गिस फाखरी ही अभिनेता उदय चोप्राला सोडून आता एका म्युझिक डिरेक्टरच्या प्रेमात पडली आहे. 38 वर्षीय अभिनेत्री नर्गिसने स्वत: ही बाब कन्फर्म केलं आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये ही चर्चा रंगलीये.

बॉलिवूडमध्ये फार कमी सिनेमांमधून दिसलेली नर्गिस ही अभिनेता उदय चोप्राला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. अनेकदा दोघांना एकत्र बघण्यात आले होते. पण आता ते दोघे एकत्र नसल्याचा खुलासा झाला आहे. आणि हा खुलासा स्वत: नर्गिसने केला आहे. 

नर्गिस ही सध्या अमेरिकन म्युझिक डिरेक्टर मॅट अॅलोन्झो याला डेट करत आहे.  नर्गिसने काही दिवसांपूर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅंट सोबतचे फोटो शेअर केले होते. त्यातील एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या फोटोत नर्गिसने हातावर टॅटू काढलेला दिसतोय आणि त्यात 'MN' असं लिहिलं आहे. दोघांच्या नावातील पहिलं अक्षर या टॅटूत आहेत. 

NewsX ने दिलेल्या वृत्तानुसार, हा एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा फाऊंडर आहे. तो म्युझिक कंपोजर आणि कोरिओग्राफर म्हणूनही प्रसिद्ध आहे.  

टॅग्स :नर्गिस फाकरीबॉलिवूड