बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयासोबतच शिस्त, वेळेचे पालन आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या ते साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी 'ओ'रोमिओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'ओ'रोमिओ'मध्ये नाना पाटेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी नुकताच सेटवरील एक असा किस्सा शेअर केला आहे, जो ऐकून नानांच्या जिद्दीला तुम्हीही सलाम कराल.
'ओ'रोमिओ' चित्रपटातील एका अत्यंत कठीण अॅक्शन सीनचे चित्रीकरण एका चालत्या ट्रेनच्या सेटवर सुरू होते. अॅक्शन सीन म्हटलं की शारीरिक ताकद आणि एकाग्रता लागतेच. पण याच वेळी नाना पाटेकर यांची प्रकृती खालावले होती. त्यांना चक्क १०२ अंश ताप होता. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिले आणि पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र, नानांनी विश्रांती करण्यास नकार देत शुटिंग पुर्ण करणार असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "नाही, मी परत जाणार नाही. मला हा सीन पूर्ण करायचा आहे. माझ्यामुळे शूटिंग आणि लोकेशन कॅन्सल होण्याचा ताण मी घेऊ शकत नाही". विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, त्या प्रचंड तापातही त्यांनी पुढचे सलग ४ तास चित्रीकरण पूर्ण केले.
भारद्वाज म्हणाले की, "नानांचे शरीर तापाने इतके गरम होते की कपाळाला हात लावला तरी चटके बसत होते. शॉट्सच्या मधल्या वेळेत ते ट्रेनच्या सेटवरच झोपून थोडा आराम घ्यायचे. पण एकदा का कॅमेरा सुरू झाला की, त्यांना पाहून असं वाटायचं नाही की ते आजारी आहेत. हेच एका महान कलाकाराचे लक्षण आहे", अशा शब्दांत भारद्वाज यांनी नानांच्या कमिटमेंटचे कौतुक केले.
'ओ रोमियो'बद्दल थोडक्यात
विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमियो' हा चित्रपट ९० च्या दशकातील मुंबई अंडरवर्ल्डवर आधारित असून यात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, फरिदा जलाल आणि विक्रांत मॅसी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Summary : Despite a 102°F fever, Nana Patekar insisted on completing a challenging action scene for 'O Romeo', impressing director Vishal Bhardwaj with his dedication. He refused to halt shooting, showcasing commitment.
Web Summary : 102 बुखार होने के बावजूद, नाना पाटेकर 'ओ'रोमियो' के लिए एक्शन सीन पूरा करने पर अड़े रहे, विशाल भारद्वाज उनकी लगन से प्रभावित हुए। शूटिंग रोकने से इनकार कर दिया, प्रतिबद्धता दिखाई।