Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबई असो वा गंगटोक...', ट्राफिकमध्ये अडकले नम्रता संभेराव अन् प्रसाद खांडेकर, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:27 IST

अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते.

अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या माध्यमातून नम्रता-प्रसाद यांची जोडी चांगलीच गाजली. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अलिकडेच प्रसाद आणि नम्रता आपल्या कुटुंबासह एकत्र गंगटोक फिरायला गेले आहेत.  पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याने प्रसाद-नम्रताला तिथेही मुंबईप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचे काही फोटो प्रसादने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. यात गंगटोकची वाहतूक कोंडी दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये लिहलं, 'मुंबई असो वा गंगटोक ट्राफिक काय पाठलाग सोडत नाही'. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रसाद खांडेकर गाडीच्या बाजूला दिसून येत आहे. गाडीमध्ये प्रसादचं कुटुंब बसलेलं पाहायला मिळतेय. या फोटो दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'ट्राफिकमध्ये वैतागलेले ट्रेकर्स'. ही पोस्ट प्रसादने त्याची पत्नी अल्पा खांडेकर, अभिनेत्री नम्रता संभेराव, तिचे पती योगेश संभेराव आणि त्यांचा मुलगा रुद्राज यांना टॅग केलं आहे. 

नम्रता संभेरावचा नुकताच 'नाच गं घुमा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये तिच्यासह अभिनेत्री मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसादने नम्रताला खास पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होता. सध्या या चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. तर प्रसाद आणि नम्रातने 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलं होतं. प्रसाद आणि नम्रता दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून एकमेंकाना सपोर्ट करताना दिसून येतात. 

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावसेलिब्रिटीमराठी अभिनेता