Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरंच की काय... नागिन फेम अनीता हसनंदानी आहे प्रेग्नेंट, जुळ्या मुलांची दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:48 IST

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनीता हसनंदानी प्रेग्नेंट असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनीता हसनंदानी प्रेग्नेंट असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अनीताने नवऱ्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात स्पेशल मॅसेज लिहिला आहे. त्यात अनीताने जुळ्या मुलांचा उल्लेख केला आहे. अनीताच्या कॅप्शनमुळे तिचे प्रेग्नेंसी वृत्त खरे असल्याचे वाटते आहे. 

'नागिन' फेम अभिनेत्री अनीत हसनंदानीने तिचा नवरा रोहित रेड्डीच्या वाढिदिवसानिमित्त रोमँटिक बुमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओसोबत तिने म्हटले आहे की, 'माझ्या जीवनातील प्रेम, जे दिवसेंदिवस आणखीन बहरत चालले आहे. तुझ्या जीवनात नेहमीच आनंद यावा, यासाठी मी प्रार्थना करेन. सोबतच सीक्स पॅक अॅब्स आणि हो दोन क्यूट मुले देखील. लवकरच. लव यू.'

अनीताच्या या पोस्टनंतर ती जुडवा मुलांना जन्म देणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत अनीताने कोणताही खुलासा केलेला नाही. यापूर्वीदेखील अनीता सरोगसीने आई बनणार असल्याची चर्चा होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे अनीताने सांगितले.

त्यावेळी तिने सांगितले होते की, ती 'नागिन ३' मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर बेबी प्लान करणार आहे. प्रेग्नेंसीदरम्यान बिझी शेड्युल नको आहे.

अनीता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एकता कपूरची खास मैत्रिण आहे. सध्या अनीता 'नागिन ३' मालिकेत विशाखाची भूमिका करते आहे. यातील अनीताचा क्लासी लूक व ट्रेंडी आऊटफिट लोकांना खूप आवडतो आहे.

टॅग्स :एकता कपूर