Join us
Daily Top 2Weekly Top 5

 नफीसा अलींनी केले मुंडण, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 11:35 IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान आणि आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोनाली, इरफान व ताहिरानंतर दिग्गज अभिनेत्री नफीसा अली यांनाही कॅन्सरने घेतले आहे. नफीसा यांचा कॅन्सर थर्ड स्टेजला पोहोचला आहे.

ठळक मुद्देनफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान आणि आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोनाली, इरफान व ताहिरानंतर दिग्गज अभिनेत्री नफीसा अली यांनाही कॅन्सरने घेतले आहे. नफीसा यांचा कॅन्सर थर्ड स्टेजला पोहोचला आहे. नफीसा यांनी अलीकडे सोनिया गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, याचा खुलासा केला होता. ‘माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीला भेटले. तिने मला कॅन्सरशी लढण्यासाठी शुभेच्छा दिल्यात,’ असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. आता नफीसा यांनी आणखी एक व्हिडीओ  शेअर केला आहे.

या व्हिडीओत नफीसा यांचे नातवंड त्यांचे केस कापत आहेत. ‘नातवंडांना मी माझे केस कापायला सांगितले. मी किमोथेरपीसाठी जातेय, याची त्यांना कल्पनाही नाही. आम्ही खूप मस्ती केली,’असे नफीसा यांनी लिहिली. यानंतर पूर्ण मुंडन केल्यानंतरचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

त्याआधी एका पोस्टमध्ये मात्र त्या भावूक झाल्यात. माझे खूप सारे केस गळू लागले आहेत. ते पाहून मला रडू आले. उगाच नाही, वास्तव हे आहे की, मला कॅन्सर आहे. किमोथेरपी काम करतेय, असे त्यांनी लिहिले.

नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे. जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 

टॅग्स :नफीसा अली