Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नाळ'मधील चैत्या उर्फ श्रीनिवास पोकळे झळकणार रिंकू राजगुरूसोबत 'छूमंतर'मध्ये?, फोटो आले समोर

By तेजल गावडे | Updated: October 23, 2020 16:10 IST

श्रीनिवास पोकळे छूमंतर चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.

नाळ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात चैतन्य म्हणजेच चैत्याच्या भूमिकेत आपल्याला श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराला पाहायला मिळाला होता. नाळ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी श्रीनिवास केवळ आठ वर्षांचा होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. आता तो छूमंतर या मराठी चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. अद्याप या बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

श्रीनिवास पोकळे छूमंतर चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना लंडनमध्ये आहेत. नुकतेच रिंकू राजगुरूने इंस्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रिंकूसोबत श्रीनिवास मस्ती करताना दिसतो आहे.

तसेच यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेदेखील श्रीनिवाससोबतचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाला. या चित्रपटात श्रीनिवास काम करतो की नाही हे लवकरच समजेल.

छूमंतर चित्रपटाबद्दल ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थना बेहरे म्हणाली की, जवळपास सहा महिन्यांहून जास्त लॉकडाउननंतर कामाला सुरूवात केल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला वाटतं की छूमंतर हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे परदेशात शूटिंग सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत.

छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :नाळरिंकू राजगुरूप्रार्थना बेहरेसुव्रत जोशीऋषी सक्सेना