Join us
Daily Top 2Weekly Top 5

Naagin 7: कोण असणार एकता कपूरची नवीन 'नागिन'?, या २ अभिनेत्रींमध्ये आहे टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 20:10 IST

Naagin 7 : एकता कपूरच्या नागिन या लोकप्रिय शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'नागिन ६' नंतर 'नागिन ७' संदर्भात अनेक नायिकांची नावे चर्चेत आहेत. पण आता दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

एकता कपूर(Ekta Kapoor)चा नवीन 'नागिन' (Naagin) कोण असेल याबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 'गुम है किसी के प्यार में' मधील आयशा सिंगचे नाव चर्चेत आहे आणि आता कनिका मानला अप्रोच केले असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, 'नागिन ७'साठी या दोन अभिनेत्रींपैकी कोणती फायनल होईल हे सांगणे अद्याप कठीण आहे.

'नागिन ६'ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यापासून, नवीन 'नागिन' कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सध्या मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. दरम्यान, कनिकाच्या नावाची जास्त चर्चा होत आहे. विशेष म्हणजे रिपोर्टमध्ये कुठेही नागिनचा उल्लेख नाही पण चाहते तिला 'नागिन ७' शी जोडत आहेत.

अभिषेक कुमारचे नाव चर्चेत आहेआयशा सिंगसोबतच अभिषेक कुमारचेही नाव चर्चेत आहे. या शोमध्ये अभिषेक अंकिता लोखंडेसोबत दिसणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण नंतर आयशाचे नाव समोर आल्यानंतर चाहत्यांना अभिषेक आणि आयशाची जोडी आवडू लागली. मात्र, याबाबत अभिषेकला विचारले असता त्याने असे काही नसल्याचे उत्तर दिले. याबद्दल अशा बातम्या का येत आहेत माहीत नाही.

मालिकेला मिळालाय उदंड प्रतिसादएकता कपूरने मौनी रॉयसोबत 'नागिन' ही मालिका सुरू केली होती. पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर एकताने या शोचे ६ सीझन केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक सीझन लोकप्रिय झाला. मागच्या वेळी 'सिझन ६' मध्ये तेजस्वी प्रकाश मुख्य भूमिकेत होती. पण आता 'नागिन ७' मध्ये कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे पाहावे लागेल.

टॅग्स :एकता कपूर