Join us

"माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा..", संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:22 IST

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा 'छावा' (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर(Laxman Utekar)ने केले आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो छावा सिनेमासाठी घोडेस्वारी आणि इतर गोष्टींचं प्रशिक्षण घेताना दिसतो आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, छावा १४ तारखेला प्रदर्शित होतोय. त्याही पेक्षा माझ्या राजांचा चित्रपट येतोय ह्याचा आनंद काय आणि किती आहे कसं सांगू आणि खरंच खूप भाग्यवान आहे की, मी ह्या चित्रपटाचा एक भाग आहे. ह्या माझ्या राजांच्या बांधलेल्या मंदिरातला एक छोटासा दगड होण्याची संधी माझ्या राजांच्या माझ्या देवाच्या आशीर्वादाने मला मिळाली. छावा चित्रपटाच्या शूटिंग अगोदर घेतलेल्या प्रशिक्षणच्या आठवणी तुमच्या सोबत शेअर करतोय. जय भवानी.जय शिवराय. जय शंभू राजे. जगभरात आगाऊ बुकिंगला सुरूवात झालीय. 

संतोष जुवेकरने 'छावा' सिनेमामध्ये रायाजी मालगे यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ८ मुख्य योद्ध्यांमध्ये रायाजी यांचादेखील समावेश होता. या भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याने विकीसोबत २ महिने प्रशिक्षण घेतलं. घोडेस्वारी, तलवारबाजी,भालाफेकही तो शिकला. संतोषला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :संतोष जुवेकर'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना