चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) लवकरच एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहेत ज्यासाठी ते स्टार्सच्या शोधात होते. त्यांनी आयुषमान खुराणा(Ayushman Khurana)ला त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी साइन केले आहे आणि आता सूरज बडजात्या यांना त्यांची हिरोईन सापडल्याची बातमी समोर येत आहे. या फ्रेश जोडीसोबत ते एक नवा रोमँटिक सिनेमा बनवणार आहेत. त्यांनी मुंज्या फेम शर्वरी वाघ(Sharvari Wagh)ला आयुषमानसोबत कास्ट केले आहे.
माधुरी दीक्षित, करीना कपूर, भाग्यश्री यांसारख्या नायिकांच्या करिअरला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या लवकरच एका नव्या अभिनेत्रीसोबत आपला प्रोजेक्ट सुरू करत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सूरज बडजात्या यांनी शर्वरी वाघला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटात ती आयुषमान खुराणासोबत दिसणार आहे. ते एक प्रेमकथा बनवत आहेत ज्यासाठी ते शर्वरी आणि आयुषमान ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. हे दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र येतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वर्कफ्रंट
आयुषमान खुराणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच सारा अली खानसोबत छोटी सी बातच्या रिमेकमध्ये दिसणार आहे, याशिवाय त्याच्याकडे एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. तर शर्वरी वाघ अल्फामध्ये आलिया भटसोबत दिसणार आहे.