रिएलिटी शोमधल्या प्रत्येकाच्या जीवनात काही तरी भव्य दिव्य करण्याचे स्वप्न असते. हे स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करून परीक्षक आणि प्रेक्षक यांना रिझवण्यासाठी सतत आपली प्रतिभा प्रदर्शित करत असतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'इंडियन आयडॉल 10' हा कार्यक्रम त्यातील सर्वोत्कृष्ट 11 स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्सेसद्वारे जगभरातील श्रोत्यांचे सतत मनोरंजन करतो आहे. भारताच्या या सर्वात मोठ्या गायन रिएलिटी शोमध्ये विशाल दादलानी एका गायकाच्या दोषारहित गायनाने इतका प्रभावित झाला की, त्याने त्या गायकाला आपल्या कोर टीममध्ये स्थान देऊ केले. 'इंडियन आयडॉल 10'च्या अलीकडच्या भागात मुंबईचा गायक कुणाल पंडित याने आपल्या गायक कौशल्याने सर्वांना थक्क केले. 'दिल दिया गल्लां' या त्याने गायलेल्या हळुवार गीताने परीक्षक आणि आमंत्रित पाहुणे कलाकार खूपच प्रभावित झाले. सेटवर उपस्थित सुपरस्टार सलमान खान आणि लवयात्री या आगामी चित्रपटाचे कलाकार आयुष आणि वारिना यांनी कुणालच्या गायन कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले.'इंडियन आयडॉल 10'चा परीक्षक विशाल दादलानी म्हणाला,' हे गीत माझे खूप आवडते आहे व माझ्यासाठी ते खास आहे. दिल दिया गल्लां या गीताचे कुणालचे सादरीकरण मला खूप भावले आहे. कारण त्याने गीताच्या भावनेस पूर्ण न्याय दिला आहे. आजचा कुणालचा परफॉर्मन्स पाहून मला खात्री आहे की, त्याचा यापुढील परफॉर्मन्स पाहण्यासाठी मी किंमत देखील देऊ शकतो.'
मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 18:32 IST
'इंडियन आयडॉल 10'च्या अलीकडच्या भागात मुंबईचा गायक कुणाल पंडित याने आपल्या गायक कौशल्याने सर्वांना थक्क केले.
मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान
ठळक मुद्देकुणाल पंडितने आपल्या गायक कौशल्याने सर्वांना केले थक्क विशाल दादलानीने केले कौतूक