Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यात तर फक्त भांडण सुरू झालंय...", मुक्ता बर्वेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:12 IST

Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (mukta barve). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. मुक्ता सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा तिने केलेल्या पोस्ट चर्चेत येत असतात. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुक्ता बर्वे हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने सुपरहिरो डेडपूल सोबतचा फोटो शेअर केला आहे. यात ती त्याच्यावर रागवताना दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, काही सर्वोत्कृष्ट प्रेम कथा मर्डरने सुरू होतात....डेडपूल. (आमच्यात तर फक्त भांडण सुरु झालंय). तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाएका युजरने लिहिले की, डेडपूलला टशन देण्याची हिंमत तुझ्यातच आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, मुक्ता बी लाईक अरे वेड्या चारचौघी बघितलेस का? तुझ्यापेक्षा भारी आमची रोहिणी मावशी आहे. आणखी एकाने लिहिले की, सुपर हिरो विथ सुपर अॅक्ट्रेस. अजून एकाने म्हटले की, मागे तुझी रुद्रम ही मालिका बघितली होती , त्यावेळी पण तू असाच अवतार धारण केला होतास.

वर्कफ्रंट..मुक्ता बर्वेने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटकांमधून स्वतःची छाप पाडली. मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दरम्यान,  मुक्ता सध्या चारचौघी या नाटकात काम करत आहे. या नाटकात तिच्यासोबत पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम हे कलाकार दिसून येत आहेत.

टॅग्स :मुक्ता बर्वे