Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:23 IST

एकीकडे मराठी-हिंदी वाद सुरू असताना दुसरीकडे एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक होत आहे. मुक्ता बर्वेचा सिनेमा गुजरातीत प्रदर्शित केला जाणार आहे. 

राज्यात त्रिभाषा सूत्रअंतर्गत हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे हिंदी-मराठी वादाला तोंड फुटलं. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता यायलाच हवं, यासाठी मोर्चाही निघाला. अनेक मराठी कलाकारांनीही याला पाठिंबा दिला. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक होत आहे. मुक्ता बर्वेचा सिनेमा गुजरातीत प्रदर्शित केला जाणार आहे. 

गुजरातीत रिमेक होणाऱ्या या मराठी सिनेमाचं नाव आहे 'नाच गं घुमा'. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेला 'नाच गं घुमा' हा सिनेमा गेल्यावर्षी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमात घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीची गोष्ट दाखवण्यात आली होती. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही विशेष प्रेम मिळालं. परेश मोकाशींचं दिग्दर्शन असलेल्या 'नाच गं घुमा'चा आता गुजरातीत रिमेक येणार आहे. याचा ट्रेलर मधुगंधा कुलकर्णीने शेअर केला आहे. महाराणी असं या सिनेमाचं नाव असून येत्या १ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान. 'नाच गं घुमा' सिनेमात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्यासोबत सुकन्या मोने, सारंग साठ्ये, बालकलाकार मायरा वायकुळ, शर्मिष्ठा राऊत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २१.३३ कोटींची कमाई केली होती. 

टॅग्स :मुक्ता बर्वेनम्रता आवटे संभेराव