Join us
Daily Top 2Weekly Top 5

सून असावी तर अशी..! मृण्मयी देशपांडेने चक्क सासरेबुवांना शिकवलं पाऊट करायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 16:23 IST

मृण्मयी देशपांडे हिने नुकताच सासऱ्यांसोबत फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. लॉकडाउनमध्ये क्वारंटाईन झालेली मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

मृण्मयी देशपांडे हिने नुकताच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती, तिचा नवरा व सासरे आहेत. यात ते तिघे पाऊट करताना दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करत तिने सांगितले की, माझे सासरे म्हणतात- माणसांनी शिकण्याची वृत्ती कोणत्याही वयात सोडली नाही पाहिजे... !! मग मी त्यांना 'पाऊट' शिकवला...

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे