Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया, कतरिना इतकीच हीट आहे बॉलिवूडमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 15:16 IST

मुळाची नागपूरची असलेली ही अभिनेत्री रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक मराठी अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमधील अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'कुमकुम भाग्य' या प्रसिद्ध मालिकेतील बुलबुलची भूमिका साकारणारी मृणाल ठाकूर तुम्हाला आठवतेय.

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने  रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

मृणाल चर्चेत आली ती 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमामुळे. 'लव्ह सोनिया' हा दोन बहिणींचा सिनेमा आहे. सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या सोडणाऱ्या बहिणीची गोष्ट आहे. गेल्यावर्षी आलेल्या ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. 

मृणालला चित्र काढणे, रंगवणे, मेहंदी काढणे या गोष्टींची मला फार आवड होती. त्याकाळात पॉकेटमनीसाठी थोडे जास्त पैसे मिळावे म्हणून मी लग्नात नवरीच्या हातावर मेहंदी काढायला जायचे. लवकरच मृणाल नेटफ्लिक्सवर येणा-या ‘बाहुबली’ या वेब सीरिजमध्येही शिवगामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मृणाल ठाकूर हिने आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. आमिर खानला मृणालला फातिमा सना शेखची भूमिका द्यायची होती. मात्र काही कारणामुळे तसे होऊ शकले नाही. एकूणच काय मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरचे करिअर सध्या बॉलिवूडमध्ये जोरात आहे.

 

टॅग्स :सुपर 30