Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑनस्क्रीन तर सोडाच ऑफस्क्रीनही बोल्ड रुपात दिसली नाही मृणाल दुसानीस, तिच्या पतीलाही पडला होता हा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 16:53 IST

मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानीशची ओळख. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेनंतर मृणालने  'तू तिथे मी', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं. या मालिकांमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मालिकांमध्ये अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी मृणाल रिअल लाइफमध्येही तितकीच साधी आहे. वैयक्तिक आयुष्यातही तिने हा आपला साधेपणा जपला आहे. मात्र या साधेपणामुळे मृणालच्या आयुष्यात एक गंमतीशीर प्रसंग घडला. 

 25 फेब्रुवारी 2016 रोजी मृणाल अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने ती लग्नबंधनात अडकली.  मात्र कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. मृणाल ही अभिनेत्री असल्याचे नीरजला सांगण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला जाण्याआधी त्याने मृणालचे फोटो इंटरनेटवर पाहिले होते. 

अभिनेत्री असूनही नीरजला मृणालचा मॉडर्न किंवा हॉट अंदाजातील एकही फोटो दिसला नाही. त्यामुळे तू कायमच पंजाबी ड्रेसच घालतेस का असा प्रश्न नीरजने पहिल्याच भेटीत मृणालला विचारला होता. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

तसेच,साचेबद्ध कामात न अडकता आव्हानात्मक भूमिका साकारण्याकडे तिचा कल असतो.  कधीही कुठल्याच कॉँट्र्वर्सीत तिचे नाव आलेले नाही. तिने जपलेला हा साधेपणा चाहत्यांनाही आपलेसे करुन जातो. 

टॅग्स :मृणाल दुसानीस