Join us
Daily Top 2Weekly Top 5

मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 11:56 IST

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी  यांची कन्या पायल डिकी सिन्हाचे गत 13 डिसेंबरला रात्री दोनच्या सुमारास निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती.

ठळक मुद्देपायल एप्रिल 2018 मध्ये कोमामध्ये गेली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी  यांची कन्या पायल डिकी सिन्हाचे गत 13 डिसेंबरला रात्री दोनच्या सुमारास निधन झाले. पायल दीर्घकाळापासून आजारी होती. ती  juvenile diabetes या आजाराने ग्रस्त होती. पायलच्या मृत्यूनंतर तिचा पती डिकी सिन्हा याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत डिकीने हे खुलासे केलेत. त्याने सांगितले की, माझ्यात आणि सासरच्या मंडळींमध्ये सर्व काही ठीक नव्हतेच. खरे तर मला त्यांच्याबद्दल काहीही समस्या नव्हती. मी केस जिंकली होती आणि पायल माझ्यासोबत राहत होती. तिच्या अखेरच्या क्षणीही ती माझ्यासोबत होती. मौसमी पायलची आई होत्या. पण पायलच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचा चेहराही पाहिला नाही.

त्या तिच्या अंतिम संस्कारालाही आल्या नाहीत. स्मशानभूमीतही त्या नव्हत्या. केवळ पायलचे वडिल आणि तिची बहीण अंत्यसंस्कारावेळी हजर होते. पायल जिवंत होती तेव्हा तिची बहीण मेघा हिने एकदा तिला बळजबरीने प्रसाद चारला. हा प्रसाद खाल्ल्यानंतर पायल जवळपास गंभीर झाली होती. त्या लोकांनी पायलच्या आजारपणाला इगो इश्यू बनवला. मी ज्याप्रमाणे पायलची काळजी घेत होतो, ते पाहून काही सेलिब्रिटींनी माझे कौतुक केले होते. यानंतर मौसमी यांनी माझ्याशी वाद सुरु केलेत आणि हे वाद चव्हाट्यावर आणलेत. मी पहिल्यांदा याबद्दल बोलतोय. स्वत:ला स्वच्छ सिद्ध करण्यासाठी नाही तर सत्य समोर यावे, म्हणून मी बोलतोय.’

पायल जवळपास अडीच वर्षे कोमात होती. दोन वेळा ती शुद्धीवर आली होती. अगदी आधाराने तिला चालवण्यातही आम्ही यशस्वी झालो होतो. पण यानंतर काही कॉम्प्लिकेशन आल्या. या आजारपणात तिच्यावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यात. एकदा बे्रन सर्जरी झाली. गेल्या दोन महिन्यांत मौसमी केवळ पाचवेळा अगदी पाच मिनिटांसाठी हॉस्पीटलमध्ये आल्यात. माझ्याकडे याचे रेकॉर्डिंग आहे. मी कधीच पायलची देखरेख करण्यास नकार दिला नाही. मी पूर्ण प्रयत्न केलेत, असेही त्याने सांगितले.पायल एप्रिल 2018 मध्ये कोमामध्ये गेली होती. तिचा पती डिकी सिन्हा तिला रूग्णालयातून घरी घेऊन आला होता. मात्र यानंतर  पती डिकी पायलची योग्य ती काळजी घेत नसल्याचा आरोपही मौसमी यांनी जावयावर केला होता.  तसेच पायलची दिवसेंदिवस खालावत चाललेली तब्येतीमुळे डिकीने पायलवरचे सगळे उपचार बंदद केल्याचाही आरोप मौसमी यांनी डिकीवर केले होते.  शिवाय मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

टॅग्स :मौसमी चॅटर्जी