Join us

Oops!! मौनी रॉयच्या ड्रेसनं दिला दगा; कॅमेर्‍यांना पाहताच ठोकली धूम, तरीही झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 14:37 IST

Mouni Roy Oops Moment Video : आणखी फजिती नको म्हणून मौनीने आपल्या कारकडे अशी काही धूम ठोकली की पाहून सगळेच हैराण झालेत.

ठळक मुद्देमौनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करणे सुरू केले. ड्रेसमुळे फजिती होणार हे माहित असताना असे ड्रेस घालायचेच का? असा सवाल एका युजरने केला.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सतत तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या काय तर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. होय, या व्हिडीओत डिझाईनर ड्रेस घातलेली मौनी रॉय पापाराझींच्या कॅमे-यांना घाबरून पळताना दिसतेय.होय, मौनीचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. पण अलीकडे असे काही झाले की, ड्रेसमुळे ती काहीशी ओशाळली. मग काय फजिती टाळण्यासाठी ती तिच्या कारकडे धावत सुटली. (Mouni Roy Oops Moment Video)

मौनीने प्रिंटेड हॉल्टर नेक, डीप बॅक ड्रेस घातला होता. आधी तर तिने पापाराझींना मस्तपैकी पोज दिल्यात. पोज देताना मौनी अलर्ट होतीच. पण अचानक ड्रेसने दगा दिला आणि ती वार्डरोब मालफंक्शनची शिकार झाली. आणखी फजिती नको म्हणून मौनीने आपल्या कारकडे अशी काही धूम ठोकली की पाहून सगळेच हैराण झालेत. धावत धावत ती तिच्या कारमध्ये जाऊन बसली. अर्थातकारमध्ये बसतानाही पुन्हा एकदा ड्रेसने दगा दिला. याचाच व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

झाली ट्रोलमौनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करणे सुरू केले. ड्रेसमुळे फजिती होणार हे माहित असताना असे ड्रेस घालायचेच का? असा सवाल एका युजरने केला. तू कितीही प्रयत्न कर, चित्रपटात लीड रोल मिळायचा नाही. हिला हाच शॉर्टकट वाटतो, अशी कमेंट एका युजरने केली.बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अ‍ॅक्टिंगसोबतच लूकमुळेही चर्चेत असते. टीव्हीचा पडदा गाजवल्यानंतर मौनीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकापाठोपाठ एक सिनेमे साईन करत सुटली. आता तर टीव्हीला रामराम ठोकत मौनी बॉलिवूडमध्ये रमली आहे. अक्षय कुमार स्टारर ‘गोल्ड’ हा मौनीचा पहिला चित्रपट. यानंतर ब्रह्मास्त्र, मेड इन चायना अशा अनेक चित्रपटांत तिची वर्णी लागली. 

टॅग्स :मौनी राॅय