Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज पिझ्झा खा, दूध पी...! मौनी रॉयला चाहत्यांनी दिले एकापेक्षा एक भारी सल्ले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 21:36 IST

टीव्हीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी लवकरचं अभिनेत्री मौनी रॉय अलीकडे बरीच सडपातळ दिसू लागलीय. अगदी ओळखू येऊ नये, इतकी सडपातळ. आता का, ते मात्र आम्हाला माहित नाही. पण तिची ही स्थिती बघून चाहते मात्र काळजीत पडले आहेत. 

टीव्हीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी लवकरचं अभिनेत्री मौनी रॉय अलीकडे बरीच सडपातळ दिसू लागलीय. अगदी ओळखू येऊ नये, इतकी सडपातळ. आता का, ते मात्र आम्हाला माहित नाही. पण तिची ही स्थिती बघून चाहते मात्र काळजीत पडले आहेत. कुणाला ती आजारी वाटतेय तर कुणाला कुपोषित. मग काय, वेगवेगळ्या चाहत्यांनी तिला वेगवेगळा सल्ला दिला आहे. काही लोकांनी तिला पिझ्झा खायचा सल्ला दिलाय. तर कुणी तिला रोज न चुकता दूध प्यायला सुचवले आहे.

अलीकडे मौनीने आपला एक ताजा फोटो शेअर केला. यात ती सुंदर लाचा नेसलेली आहे. पण हा फोटो पाहून बहुतांश चाहत्यांनी तिला ‘कुपोषित’ ठरवले. ‘प्लीज प्लीज, काही खा. तुझे वजन खूप कमी झालेय. तू आधी किती सुंदर दिसायची,’ असे एका युजरने अगदी कळकळीने लिहिले. काहींनी तर चक्क मौनीला आजारी संबोधले. ‘मौनी, तू आजाऱ्यासारखी दिसतेय. थोडे तर खा,’ असे एकाने लिहिले. काहींनी मौनीवर लिप सर्जरी करण्याचा आरोप ठेवला. ‘तुझे वजन दिवसागणिक कमी होतेय, अन् ओठ जाड होताहेत,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. ‘तू एक सुंदर बंगाली मुलगी होतीस़ मग तू प्लास्टिक सर्जरी केली. या सर्जरीने तुला ग्लॅमरस बनवले. पण तुझे ओठ दिवसेंदिवस जाड होत आहेत. ते तुझ्यावर जराही शोभून दिसत नाहीत,’ असे एका चाहत्याने लिहिले.एकंदर काय तर चाहत्यांनी मौनीच्या लूकवर ब-याचअंशी नाराजी व्यक्त केली. आता मौनी चाहत्यांची ही नाराजी किती मनावर घेते, ते बघूच.लवकरच मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मध्ये ती दिसणार आहे.

टॅग्स :मौनी राॅय