Join us
Daily Top 2Weekly Top 5

इतकी हॉट की मोबाईलला लागली आग...! मौनी रॉयचे फोटो पाहून चाहत्यांना लागलं याडं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 15:35 IST

मौनी रॉयच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग!

ठळक मुद्देतूर्तास या फोटोंशिवाय मौनीच्या लग्नाच्याही चर्चा जोरात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,  मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय आणि लवकरच त्याच्याशी लग्नगाठ बांधू शकते.

मौनी रॉय तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ग्लॅमरस फोटो शेअर करून मौनी कायम चर्चेत राहते. आताही तेच. मौनीने तिचे ताजे फोटो शेअर केले आणि इंटरनेटवर जणू आग लावली. यानंतरच्या कमेंट्स तर विचारू नका. अक्षरश: चाहत्यांचे मोबाईल जळाले. होय, मौनीचा लूक इतका हॉट आहे की, माझा फोन जळून खाक झाला, अशी मजेदार कमेंट तिच्या एका चाहत्याने केली.शेअर केलेल्या फोटोत मौनीने ब्लॅक कलरचा बॉडीसूट घातला आहे. जाळीच्या या स्किनफिट आऊटफिटमध्ये मौनीचे स्लिम फिगर हाइलाईट होतेय. हे फोटो पाहून चाहते अक्षरश: तिच्या प्रेमात पडले. 

तूर्तास या फोटोंशिवाय मौनीच्या लग्नाच्याही चर्चा जोरात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,  मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय आणि लवकरच त्याच्याशी लग्नगाठ बांधू शकते. लॉकडॉऊनच्या काळात मौनी अनेक महिने दुबईत होती. दुबईत मौनीची बहीण आपल्या पती व मुलांसोबत राहते. याचठिकाणी तिची सूरजसोबत ओळख झाली.

तशी सूरज नांबियारसोबतच्या मौनीच्या डेटींगच्या बातम्या आॅगस्ट 2020 मध्येच कानावर आल्या होत्या. सूरज राहतो, त्याच बिल्डिंगमध्ये तिने शूटींगही केले होते.  मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले. मौनीच्या चाहत्यांना वाट तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली मात्र असे नाही आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा  रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती.  

एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत दिसली होती.   यानंतर मौनी  'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :मौनी राॅय