मराठी सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वाढदिवसादिवशी तिने ७ मे रोजी दुबईत फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. आज तिच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर नवरा कुणालसोबत झोक्यावर बसलेला फोटो शेअर करून लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याचे सांगितले.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर कुणाल बेनोडेकरसोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, ऑफिशिएली नवरा बायको होऊन एक महिना झाला. सोनाली कुलकर्णीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत सोनाली लग्नबंधनात अडकली. वाढदिवसाच्या दिवशी लग्न झाल्याची बातमी चाहत्यांसह शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव झाला. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान फेब्रुवारी २०२० मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता.
साखरपुड्याची बातमीही सोनालीने वाढदिवसाचे निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळातच सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यादिवसानंतर सोनाली लग्न कधी करणार याकडेच लक्ष लागले होते. कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता सोनालीनेही साध्या पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
सोनाली कुलकर्णीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती.