Join us
Daily Top 2Weekly Top 5

'...अन् श्रीरामांना प्रत्यक्ष हनुमानच भेटायला आले', Adipurush शोदरम्यान थिएटरमध्ये शिरलं माकड; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:40 IST

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित, प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा आज प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाची बंपर ओपनिंग होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिनेमाचं तुफान अॅडव्हान्स बुकिंगही झालं होतं. रिलीजपूर्वी या चित्रपटाची 5 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात एक माकड थिएटरमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा पाहताना कॅमऱ्यात कैद झालं आहे.

ट्विटरवर एका नेटिझनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, 'आदिपुरुष' सिनेमाचा थिएटरमध्ये शो सुरु असताना एक माकडं हा सिनेमा पाहताना दिसतोय. या माकडाला पाहून प्रेक्षक भलतेच खुश झाले. काही जण ओरडू लागले तर  काही जण सिनेमातील 'जय श्री राम' हे गाणं म्हणून लागलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्यामध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवली जाईल, असं निर्णय घेण्यात आला होता. आदिपुरुषच्या टीमने यासंदर्भात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे होते, "जिथे रामायणाचे पठण केले जाते, तेथे हनुमानाचे दर्शन होते. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेला मान देऊन, प्रभासचा आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल." सिनेमा रिलीज झाल्यानंतर आता तसे फोटोही समोर आले आहेत.

ट्विटरवर थिएटर मालकांनी एक फोटो शेअर केला. यामध्ये एका सीटवर हनुमानाची आणि राम सीतेची फ्रेम ठेवण्यात आली. याला हारफुलंही वाहण्यात आली. आदिपुरुषच्या टीमच्या या निर्णयाचं कौतुकही केलं जातंय. 

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉन