Join us
Daily Top 2Weekly Top 5

जस्सी की शादी...! पाहा, मोना सिंगच्या लग्नाचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 13:52 IST

‘जस्सी जैसी कोई नहीं ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग आज लग्नबंधनात अडकली.

ठळक मुद्दे मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती.

‘जस्सी जैसी कोई नहीं ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग आज लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड श्यामसोबत तिने लग्नगाठ बांधली. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे आणि या फोटोत वधूच्या पोशाखात मोना कमालीची सुंदर दिसतेय.लाल कलरचा लेहंगा आणि त्यावर हेवी ज्वेलरी असा तिचा थाट आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मोनाचा लग्नसोहळा पार पडला. अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीय एवढेच या लग्नाला हजर होते.

 

25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी मोनाची मेहंदी सेरेमनी झाला होता. या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये मोना पिंक कलरच्या सलवार सूटमध्ये दिसली होती. 

मोनाच्या  नव-याबद्दल सांगायचे झाल्यास  तो साऊथ इंडियन बँकर आहे आणि त्याचे नाव श्याम आहे.  मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर  क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत ती दिसली.

मोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकली होती. याशिवाय सध्या एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्येही ती काम करतेय. मोनाच्या  लग्नासाठी या वेबसीरिजच्या शूटींगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. लग्नासाठी शूटींग शिफ्ट बदलण्याची विनंती मोनाने केली होती. त्यानुसार, हे बदण्यात आले आणि मोनाने शूटींग पूर्ण केले. एकेकाळी टीव्ही अ‍ॅक्टर करण ओबेरॉय आणि बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. 

टॅग्स :मोना सिंग