बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी दोघेही त्यांच्या घरी येणाऱ्या तान्हुल्या पाहुण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. काल अंगदने नेहासाठी ग्रॅण्ड बेबी शॉवर पार्टी आयोजित केली. पांढ-या रंगाचा फ्रिली फ्रॉक घालून नेहा या पार्टीत पोहोचली.
मोकळे केस आणि त्यावर टियारा याने तिचे सौंदर्य आणखीचं खुलले होते. पार्टीपूर्वी अंगद व नेहाने फोटोग्राफर्सला रोमॅन्टि पोज देतानाही दिसले.
सुरूवातीला मी लोकांपासून जाणीवपूर्वक प्रेग्नंसीची गोष्ट लपवली. कारण लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, अशी भीती मला होती. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर मला काम देणे बंद तर करणार नाही, अशीही भीती मला होती. एक चांगली गोष्ट म्हणजे, सुरूवातीच्या सहा महिन्यांपर्यंत माझे बेबी बम्प दिसले नाही. याचा मला फायदा झाला. माझी एनर्जी लेवल खूप चांगली आहे. मी यादरम्यान ‘हेलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल्ड बाय नेहा’चे शूटींग संपवले,असे तिने सांगितले होते.नेहा धूपिया आणि अंगद बेदीने लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये रॅम्पवॉक केला होता. बेबी बम्पसोबत तिचा हा पहिला रॅम्पवॉक होता. हा ट्रेंड करिना कपूरने सेट केला होता. नेहाने त्याचाच कित्ता गिरवला.