टीव्हीवर व्हिजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा आणि पुढे ‘लंडन ड्रिम्स’ या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारा अभिनेता आदित्य रॉय कपूरचे करिअर सध्या गटांगळ्या घाताना दिसतेय. म्हणायला, आदित्यने आपल्या करिअरमध्ये ‘आशिकी 2’ सारखा सुपरडुपर हिट चित्रपट दिलाय. पण या चित्रपटानंतर आदित्यच्या करिअरला गती येईल, असे वाटले असताना झाले उलटेच. यानंतर आदित्य एकाही चित्रपटात लीड रोलमध्ये दिसला नाही. पुढे तर पुन्हा एकदा साईड रोल स्वीकारण्याची वेळ त्याच्यावर आली. अर्थात आता एक नवी संधी आदित्यपुढे चालून आली आहे. होय, मोहित सूरीच्या नव्या चित्रपटात आदित्यची वर्णी लागली आहे.
आदित्य रॉय कपूरला मोहित सूरीचा आधार...! पुन्हा एकदा होणार धमाका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 11:45 IST
टीव्हीवर व्हिजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा आणि पुढे ‘लंडन ड्रिम्स’ या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारा अभिनेता आदित्य रॉय कपूरचे करिअर सध्या गटांगळ्या घाताना दिसतेय.
आदित्य रॉय कपूरला मोहित सूरीचा आधार...! पुन्हा एकदा होणार धमाका!!
ठळक मुद्देमोहित सूरीच्याच ‘आशिकी 2’ने आदित्यला नवी ओळख दिली होती. आता मोहित सूरी हाच पुन्हा एकदा आदित्यच्या करिअरची बुडती नौका वाचवणार असे दिसतेय.