Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे मोहित रैनासोबतची ही हॉट बाला? मौनी राय की आणखी कुणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 10:11 IST

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता मोहित रैना याचा एक फोटो पाहून चाहते जाम गोंधळले आहेत. होय, मोहितने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मोहित एका मिस्ट्री गर्लसोबत दिसतोय.

ठळक मुद्देमोहित सध्या ‘भौकाल’ या चित्रपटात बिझी आहे. तर मौनीकडे ब्रह्मास्त्र, मेड इन चायना, मुगल, रोमिओ-अकबर-वॉल्टर असे अनेक चित्रपट आहेत.

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता मोहित रैना याचा एक फोटो पाहून चाहते जाम गोंधळले आहेत. होय, मोहितने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मोहित एका मिस्ट्री गर्लसोबत दिसतोय. पूलमधील निळेशार पाणी, वर निळेशार आकाश, दूरवर पसरलेली हिरवळ आणि मोहित व ती...असा हा फोटो पाहून चाहते सुखावलेत. पण या फोटोत मोहितसोबतची ती बाला कोण? हा प्रश्न चाहत्यांना पडला. इतके कमी की काय, म्हणून या फोटोसोबत मोहितने पोस्ट केलेले हृदयाचे इमोजी पाहून तर चाहते आणखीच कनफ्यूज झालेत.अनेकांच्या मते,ही मोहितची नवी गर्लफ्रेन्ड आहे. तर काहींच्या मते मोहितसोबतची पूलमधील ती बाला दुसरी कुणी नसून मौनी राय आहे.

तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘देवों का देव महादेव’ फेम मोहित रैना आणि मौनी राय यांच्या नात्यात गतवर्षी एक  ट्विस्ट आला होता. होय, मोहितसोबत माझे कुठलेही नाते नाही, असे म्हणून मौनीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

‘जे लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यांना चांगलेच ठाऊक आहे की, मी सिंगल आहे. माझ्याकडे रिलेशनशिपसाठी वेळ नाही, यामुळे नाही तर मला अद्यापही त्या योग्य व्यक्तीचा शोध आहे, म्हणून मी सिंगल आहे. मी कुणालाही निवडून त्याच्यासोबत डेटवर जाऊ शकत नाही,’असे मौनीने म्हटले होते. यानंतर मोहितने सुद्धा मौनीसोबत तो रिलेशनशिपमध्ये नसल्याचे जाहीर केले होते. त्यापूर्वी मोहित व मौनीच्या अफेअरच्या बातम्या कायम चर्चेत होत्या. पण दोघांनीही आमच्यात असे काही नाही म्हटल्यावर या बातम्यांना पूर्णविराम लागला होता.  मात्र मोहितने शेअर केलेला हा फोटो पाहून पुन्हा एकदा या अफेअरच्या बातम्यांना ऊत आलाय. आता फक्त मोहितसोबतची ही मिस्ट्री गर्ल खरोखरच मौनी आहे की दुसरी कुणी, हेच कळायचे तेवढे बाकी आहे.मोहित सध्या ‘भौकाल’ या चित्रपटात बिझी आहे. तर मौनीकडे ब्रह्मास्त्र, मेड इन चायना, मुगल, रोमिओ-अकबर-वॉल्टर असे अनेक चित्रपट आहेत.

टॅग्स :मौनी राॅय